शत्रू असावा तर असा "     असे उद्गार अकबराने काढले  होते.        🙏अशा या महान योद्याला जन्म दिना निमित्त विनम्र अभिवादन.                       लेखन ✒️        डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे               (इतिहास अभ्यासक )

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🚩महाराणा प्रताप यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🚩
आयुष्यभर मोगलांशी दोन हात करून हळदी घाटाच्या युद्धात अकबराच्या विरोधात लढताना आपला धारोष्ण रक्ताने भारतभूमीला पावन करणारे हिंदू कुलभूषण छत्रिय कुलावंतस महाराणा प्रताप महाराज यांची  आज जयंती
इतिहासातील महान राजा पैकी मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी उदयपूरचे संस्थापक उदयसिंह (द्वितीय )आणि महाराणी जयवंता बाई यांच्या पोटी झाला . महाराणा प्रताप म्हणजे असे योध्दे  होते की त्यांनी कधीही मोगलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत. त्यांची संघर्षमय गाथा इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली .एका प्रदेशाचा राजा असून देखील संघर्षाच्या काळात त्यांनी मायारा गुहे  मध्ये केवळ रोटी खाऊन दिवस काढले होते. या गोष्टीचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये ,लोककथांमध्ये पाहायला मिळतो. हल्दी घाटाच्या  युद्धाच्यावेळी महाराणा प्रताप यांनी बहलोलखान वर असा काही वार केला होता की, त्याच्या शरीराचे आणि घोड्याचे बरोबर दोन तुकडे झाले होते. 
           स्वतःजवळ नेहमी दोन तलवारी बाळगण्याचा सल्ला महाराणा प्रताप यांना त्यांच्या मातोश्री राणी जयवंताबाई यांनी दिला होता. महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक म्हणजे अजब रसायन होते .तो इतक्या प्रचंड वेगाने दौडत की त्याचे पाय जमिनीवर दिसत नसत .त्यामुळे हवेत उडणारा घोडा अशी देखील त्याची ख्याती  होती. या चेतक घोड्याचे आपल्या राजावर इतके प्रेम होते की ,हळदी घाटाच्या युद्धाच्या वेळी चेतकने मानसिंगाच्या हत्तीवर उडी घेऊन त्याला पायदळी तुडवले  होते.जेव्हा महाराणा प्रताप जखमी झाले तेव्हा 26 फुट लांब नाला पार करत महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले होते.मुक्या जनावराला असणारी एवढी समज इतिहासात दुसरीकडे कोठेही  आढळत नाही.
        युद्ध प्रसंगी  अकबराने महाराणा प्रताप यांच्या समोर प्रस्ताव ठेवला होता की, जर  त्यांनी  मुघल सत्ते समोर मान झुकवली तर अर्धा हिंदुस्थान त्यांच्या आधिपत्याखाली देण्यात येईल. परंतु जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमान विकणार नाही या बाण्याच्या महाराणा प्रताप यांनी अकबराचा हा प्रस्ताव थेट  धुडकावून लावला व  आपल्या संस्कृतीचा मान राखला.
         महाराणा प्रताप यांनी मुघल सत्तेला तब्बल तीस वर्ष झुंजवत ठेवले. अकबराने जंग जंग पछाडले परंतु तीस वर्ष महाराणा प्रताप काही मोगलांच्या हाती आले नाहीत .
       अकबर देखील महाराणा प्रताप यांच्या शौर्यामुळे प्रभावित झाला होता. राजस्थानच्या अनेक लोकगीतांमध्ये असा उल्लेख पाहायला मिळतो की जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला तेव्हा खुद्द अकबराला ही अश्रू अनावर झाले होते.
           " शत्रू असावा तर असा "
    असे उद्गार अकबराने काढले  होते.
       🙏अशा या महान योद्याला जन्म दिना निमित्त विनम्र अभिवादन.            
          लेखन ✒️
       डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे 
             (इतिहास अभ्यासक )