साहित्य खरेदी करण्यापेक्षा शहरातील मृत व्यक्तींचे अंत्यविधी महापालिकेने स्वखर्चाने करावा : संजोग वाघेरे*.  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*साहित्य खरेदी करण्यापेक्षा शहरातील मृत व्यक्तींचे अंत्यविधी महापालिकेने स्वखर्चाने करावा : संजोग वाघेरे*.    पिंपरी(प्रतिनिधी) दि. ४ मे.    पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 45 दिवसात कोरोनामुळे शहरात पाच रुग्ण मृत्यू पडले आहेत. तरीही महापालिका प्रशासनाकडून 1000 रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ग्रहीत धरुन साहित्य खरेदी केली जात आहे. यापेक्षा कोरोना सदृश्य परिस्थिती शहरात होणाऱ्या मयत व त्यांच्या कुटुंबियांना होणारा मानसिक त्रास सहन कमी करण्यासाठी मयत व्यक्तींच्या अंत्यविधीचा सर्व खर्च व मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने मोफत पुरवावे अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
 
या निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र संचारबंदी व अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना सोशल डिस्टेंससिंगचे पालन व्यवस्थितरित्या करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.  त्यामुळे कोरोनासह शिवाय इतर कारणामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी कोणीही मदतीसाठी समोर येत नाही. त्यामुळे याचा नाहक त्रास पिंपरी-चिंचवडमधील बाधित कुटुंबीयांना होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 1000 रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ग्रहीत धरुन साहित्य खरेदी करण्यापेक्षा कोरोना संकट संपेपर्यंत महापालिका हद्दीतील होणाऱ्या सर्व मृत व्यक्तींचे अंत्यविधी महापालिका प्रशासनाकडून मोफत व मनुष्यबळ देऊन करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

काय आहे 1000 रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ग्रहीत धरुन साहित्य खरेदी प्रकरण.....
 
पिंपरी-चिंचवड शहरात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने  करोनामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि आजपर्यंत बाधितांचे गेलेले बळी आणि पुढील तीन ते सहा महिने करोनाचा प्रसार लक्षात घेता महापालिकेच्या वायसीएम प्रशासनाने मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांसाठीचे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एक हजार मयतांचा प्रशासकीय अंदाज समोर ठेऊन ही खरेदी केली जात असल्याने यात एक हजार प्लॅस्टिक पिशव्या व कपड्याची मागणी भांडार विभागाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे. त्यानुसार भांडार प्रशासनाने नुकतीच या खरेदीची निविदा प्रसिद्ध करत हे साहित्य खरेदी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.