*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*नथाभाऊ , पंकजा मुंडे,आणि बावनकुळे या जेष्ठ आणि निष्ठावंताना डावलून भाजपात आयारामांना संधी.*
*मुबंई :-* २१ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. तसेच मा.ऊर्जामंत्री बावनकुळे या सर्वांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा निष्ठावंतांना संधी नाकारत ,पक्षात नव्याने आलेल्यांना उमेदवारीची संधी दिली आहे. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे ४ उमेदवार असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून या चार उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं असून तशी यादीही जाहीर करण्यात आलेली आहे.