पुणे प्रवाह न्युज पोर्टल
गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या हातांना पुनीत बालन ग्रुपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
- महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार
- कलाकार, बॅंड, मंडप, साऊंड, लाईट व्यवसायातील कामगारांना मदत
पुणे, दि. २९ – सार्वजनिक गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक घटक परिश्रम घेत असतात, यापैकी काही घटक आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडले आहेत. यातील बहुतांश घटकांना लग्नसराईच्या काळात काम असते, त्यानंतर ते गणपती बाप्पाच्या चरणी सेवा रुजू करतात. मंडप, साऊंड, लाईट या क्षेत्रातील कामगार कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत, या कामागार बंधूना आणि गणेशोत्सवात विविध कला सादर करणाऱ्या कलाकारांना पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष, युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने २५० हून अधिक कामगार व कलाकारांना किटचे वाटप करण्यात आले, या प्रसंगी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, लीड मीडियाचे विनोद सातव, प्रभात बँडचे संचालक श्रीपाद सोलापूरकर, पुणे बँड कलाविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन ववले, न्यू गंधर्व बँडचे संचालक बाळासाहेब आढाव, पुणे मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिपक दाते, उपाध्यक्ष दिनकर वांजळे, सेक्रेटरी भारत गालांडे, संजय शिंदे, संजय कुलकर्णी, साऊंड व लाईट संघटनेचे बबलू रमजानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, कार्याध्यक्ष राजू कांबळे, चिटणीस मेहबूब खान शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी अध्यक्ष, शाहीर हेमंत मावळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकांची गणपती बाप्पा आणि पुण्यनगरीवर नितांत श्रद्धा आहे. गणेशोत्सवात अनेक व्यावसायायिक सहभागी असतात, त्यातील तळागाळातील घटकाला अडचणीच्या काळात विश्वस्त भावनेने पुनीत बालन यांनी दिलेला कृतज्ञतेचा शिधा ही मदत अनमोल आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सीग नियमांचे काटेकोर पालन करीत सदर मदत वाटपाचे कार्य पूर्ण झाले.