पुणे प्रवाह न्युज पोर्टल
झूमकारची सेल्फ ड्राइव्ह बुकिंग्सवर १०० टक्के सवलत
~ ४ मे पासून २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत प्रवासासाठी करता येईल बुकिंग ~
~ ३० एप्रिलपूर्वी बुकिंग करणा-या ग्राहकांना मिळणार फायदा ~
मुंबई, २८ एप्रिल २०२०: वैयक्तिक आणि स्वच्छ प्रवासी वाहतूक ही आता काळाची गरज बनली आहे. यामुळेच भारतातील सर्वात मोठा पर्सनल मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेल्या झूमकारने आज ‘नेव्हर स्टॉप लिव्हिंग’ सेलची घोषणा केली आहे ज्याद्वारे ग्राहकांना स्वच्छ वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. तसेच झुमकारने ३० एप्रिल २०२० पर्यंत केलेल्या सर्व सेल्फ ड्राइव्ह बुकिंग्सवर १०० टक्के सवलत (इनिशिअल बुकिंग रकमेवर ५० टक्के व ५० टक्के कॅशबॅक) दिली आहे. ग्राहकांना ४ मे पासून २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत प्रवासासाठी बुकिंग करता येईल. म्हणजेच ग्राहकांना हा प्रवास मोफत मिळेल.
या कालावधीत केलेल्या सर्व बुकिंगवर झूमकारचे सिक्युरिटी डिपॉझिट पूर्णपणे रिफंडेबल असेल तसेच ४ मे २०२१ पर्यंत विनामूल्य रिशेड्युलिंगचीही ऑफर आहे. ग्राहकांना Zoom 100 हा कोड वापरून ही ऑफर घेता येईल तसेच यावर झिरो कॅन्सलेशन चार्जेस आहेत. यामुळे अॅडव्हान्स बुकिंगवर त्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. दीर्घ काळासाठी ज्या ग्राहकांना बुकिंग करायचे असेल, त्यांनाही १, ३ आणि ६ महिन्यांचे सबस्क्रिप्शन अभूतपूर्व किंमतीत मिळेल.
झूमकारचे सीईओ आणि सह संस्थापक ग्रेग मोरान म्हणाले, ‘प्रवासाची गरज लक्षात घेता, प्रत्येकाला किफायतशीर आणि स्वच्छ केलेली वैयक्तिक कार मिळण्याची खात्री देणे, हे झूमकारचे उद्दिष्ट आहे. आपल्या प्रियजनांना भेटायला जाणे किंवा कामासाठी प्रवास असो, पर्सनल मोबिलिटी ही काळाची गरज आहे. झूमकार सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे.'