कोरोना विषाणू प्रादुर्भाव तपासणी मोहिमेअंतर्गत आर एस एस, जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना,फोर्स मोटर्सचे अमूल्य योगदान", --रुबल अगरवाल,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
०१/०५/२०२०,
"कोरोना विषाणू प्रादुर्भाव तपासणी मोहिमेअंतर्गत आर एस एस, जनकल्याण समिती,
भारतीय जैन संघटना,फोर्स मोटर्सचे अमूल्य योगदान",
--रुबल अगरवाल,
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त,( जनरल )
पुणे शहरातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत पुणे महापालिकेच्या मदतीकरिता व  कोरोना विषाणू प्रादुर्भावाला नष्ट करण्याकरिता या लढ्यात पुणेकर नागरिकांसह विविध संस्था,संघटना,सहभागी झालेल्या आहेत,
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविणेकरिता " कोरोना फ्री पुणे अकॅशन", अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत,
याचाच एक भाग म्हणून आर एस एस, जनकल्याण समिती,फोर्स मोटर्स,भारतीय जैन संघटना शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता पुढे आले,पुणे महापालिकेच्या साहाय्याने तपासणी मोहीमेत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले,
मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरात आर एस एस, जनकल्याण समितीने आजतागायत एप्रिल अखेर रेड झोन परिसरातील नागरिकांची तपासणी अंतर्गत सुमारे २६८७ घरांना भेटी देउन १४,३२२ नागरिकांची तपासणी करण्यात आली,
यामध्ये संशयित रुग्ण, व लक्षणे दिसून आलेल्या सुमारे ९३,नागरिकांना पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले,
तपासणी मोहिमेकरिता मा,अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी आवाहन केले असता आवाहनास अनुसरून सुमारे ५४,डॉक्टर्स व १८२ स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले,तसेच मनपाचे संबंधित महापालिका सहाययक आयुक्त व मनपाचे ३९,कर्मचारी,व ४४,पोलीस कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते,
फोर्स मोटर्स व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणीकरिता माहे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रभावी नियोजन करण्यात येउन "मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन", मध्ये १ डॉक्टर,१,रेडिओलॉजिस्ट,१,नर्स,व अन्य २ कर्मचारी,असे ५,जणांचे १ पथक, याप्रमाणे ५५ " मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन ",च्या माध्यमातून सुमारे ५५,००० नागरिकांची तपासणी करण्यात येउन औषधोउपचार करण्यात आले,
यामधील सुमारे १७०,रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने त्यांना पुढील उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे मा,रुबल अगरवाल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( जनरल ) यांनी कळविले आहे,
--संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
०१/०५/२०२०,