चांगला परतावा मिळण्यासाठी पोर्टफोलिओत वैविध्य हवे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


(लेखक: संदीप भारद्वाज, मुख्य विक्री अधिकारी, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)


 


ट्रेडिंग क्षेत्रात पोर्टफोलिओचे विविधीकरण हा प्रसिद्ध विषयांपैकी एक आहे. असे असले तरीही विशेषत: नव गुंतवणूकदारांकडून हा दुर्लक्षित विषय आहे. हंगामी गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ बऱ्यापैकी संतुलित ठेवतात ज्याद्वारे संबंधित जोखीम कमी होते तसेच एकूण परतावा वाढतो.


 


तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य का हवे?


 


थोडक्यात सांगायचे झाल्यास, बाजार किंवा विविध क्षेत्र एकसारखीच प्रतिक्रिया देत असतात, असे कधीही होत नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट भागात वृद्धी होताना दिसत असली किंवा मार्केटमध्ये मोठी वाढ होत असली तरीही काही क्षेत्रांमधील ट्रेंड घसरता असतो. परिस्थिती अगदी उलटही असू शकते. उदाहरणार्थ- सध्याचीच बाजाराची स्थिती पाहू. स्टॉक मार्केटमध्ये मोठा व्हर्चुअल रक्तपात होत आहे. मागील सलग दोन महिन्यात त्यांचे मूल्य जवळपास एक चतुर्थांशांनी कमी झाले आहे. तर दुसरीकडे फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरने याच स्थितीत वाढ झाल्याचे दर्शवले आहे. एफएमसीजी सेक्टरसाठीही ही गोष्ट लागू झाली. त्यामुळे एक चतुर गुंतवणूकदार या नात्याने मार्केट कोसळत असतानाही कमीत कमी नुकसान झेलण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत विविधता हवीच. ही लाट भरात असतानाही तुमचे परतावे वाढवून देतील.


 


गुंतवणूक कशी करावी?


 


आधी हे पक्के समजून घेऊयात की, पोर्टफोलिओ बांधणी हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी योग्य घटक कोणते आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. विविध उद्योग, व्हर्टिकल्स आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क, कंपनीचे व्यवस्थापन (प्रमुख भागधारकांसह), मागणी-पुरवठ्याचे पैलू आदी संबंधित घटकांद्वारे बाजार पूर्णपणे समजून घेणे शक्य आहे. हे एखाद्या घड्याळाप्रमाणे एकमेकांच्या संयोगाने काम करतात. तुम्ही जेवढ्या सूक्ष्मरितीने हे समजून घ्याल, तितके अचूक मूल्यांकन करू शकाल.


 


वैविध्य कसे आणाल?


 


तुमचे विविधीकरण हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक धोरणांवर अवलंबून असते. ही विविधता क्षेत्रांबाबत, मार्केट कॅपिटलायझेशन (लार्ज कॅप/मिड कॅप/ स्मॉल कॅप), किंवा गुंतवणूकीची साधने या सर्वांसंबंधी असू शकते. उत्कृष्ट विविधता असलेल्या पोर्टफोलिओमध्ये सिक्युरिटीज (विविध क्षेत्र आणि कंपनीच्या आकारासंबंधी). कमोडिटीज ( सराफा आणि बेस मेटलसह ) आणि चलन या सर्वांचे वैविध्य असते. उदाहरणार्थ, भारतातील कोरोना व्हायरसचे लॉकडाउन ३ मे २०२० रोजी संपणार असे म्हटले जातेय. तथापि, उत्कृष्ट गुंतवणूकदार पर्यायी स्थितीही लक्षा घेतो आणि त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन साधतो.


 


ध्येय निश्चित करा व नुकसान थांबवा:


 


गुंतवणूक करताना संबंधित ध्येय निश्चित करणे आवश्यक असते तसेच भावनिक गोष्टींमध्ये अडकून न पडता स्वतःचे नुकसान टाळणे ही महत्वाचे असते. याद्वारे तुम्ही गुंतवणुकीसह बरेच पुढे जाल. अखेरीस आपल्या गुंतवणुकीचा अनोखा प्लॅन, प्राधान्यक्रम आणि जोखिमीची भूक यानुसार विविधीकरण करणे हा पूर्णपणे तुमचा निर्णय असतो. एकाच क्षेत्रातील किंवा इंन्स्ट्रुमेंटमधील मालमत्ता कधीही संकलित करू नका. यामुळे तुमची जोखीम मोेठ्या प्रमाणावर वाढते. एक गुंतवणूकदार या नात्याने बाजाराची जेवढी अधिक माहिती तुम्ही ठेवाल, तेवढे चांगले शेअर्स किंवा मालमत्ता तुमच्याकडे असेल. कारण, ज्ञान आणि अंतर्दृष्टी हेच बाजाराचे खरे गेम चेंजर्स असतात.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन