आझम कॅम्पस तर्फे मुंढवा भागात गरजूंना किराणा सामानाची मदत*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट
*आझम कॅम्पस तर्फे मुंढवा भागात गरजूंना किराणा सामानाची मदत*
पुणे :
आझम कॅम्पस तर्फे मुंढवा भागातील गरजू ,मजूर , कामगार यांना  किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि नगरसेविका सौ.पूजा समीर कोद्रे  यांच्या हस्ते  ही मदत देण्यात आली .हा कार्यक्रम मंगळवार ५  मे रोजी सायंकाळी मुंढवा येथे झाला.यावेळी सचिन गायकवाड,वहाब शेख,शाहीद शेख,समीर शेख,साबीर शेख उपस्थित होते.आझम कॅम्पस शैक्षणिक परिवारातर्फे पुण्याच्या सर्व भागात गरजूंना मदत देण्याचा प्रयत्न सुरु आहे,हा उपक्रम संकट काळी धीर देणारा आहे,असे उद्गार पूजा कोद्रे यांनी काढले.आतापर्यंत कोथरूड,भवानी पेठ,लष्कर,कोंढवा,बिबवेवाडी आणि मुंढवा भागात मदत पोहोचविण्यात आल्याची माहिती डॉ पी ए इनामदार यांनी दिली.
---------------------------------