पुणे प्रवाह न्युज पोर्टल
लाडीवलीमध्ये म्हशींच्या तबल्याचे मलमूत्र रस्त्यात येत असल्याने जाब विचारला असता जीवे मारण्याची धमकी
कर्जत,ता.1 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील लाडीवली गावात एका किरकोळ कारणाने सतत आवाज उठवल्याने तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत तालुक्यातील तिवरे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली गावात ग्रामपंचायतीकडुन गटार साफसफाईचे काम सुरू होते.सदर गटार साफसफाईचे काम करताना रस्त्यावरील गटाराचे स्लॅब तोडू नये अशी सूचना ग्रामस्थ जगदीश दगडे यांनी केली होती.परंतु अनेक महिन्यात तोडलेला स्लॅब पुर्ववत केले नव्हते.त्यामुळे त्या भागात असलेल्या म्हशींच्या तबेल्यातील मलमूत्र हे रस्त्याने गावातून वाहून जात आहे.त्या मलमूत्र यामुळे दुर्गंधी पसरली असून रस्त्याच्या दुतर्फा असलेले गटार बांधण्याची मागणी जगदीश दगडे यांनी केली होती. म्हशीच्या तबेल्यातील म्हशींचे शेण आणि मलमुत्र जमा होऊन रस्त्याने पाण्याबरोबर वाहून जात आहे.त्या उघड्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून लाडीवली गावातील लहान मुलेही त्यामुळे आजारी पडत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन तुटलेल्या स्लॅबच्या ग्रामस्थ दगडे यांनी तिवरे ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक सुर्यवंशी,ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय तिखंडे तसेच सदस्य संतोष भासे हे तक्रारी प्रमाणे रस्त्याची आणि गटारांची पाहणी करण्यासाठी गेले.ती पाहणी सुरू असताना
नंदकुमार नाखते,बाळाराम नाखते हे घटनास्थळी धावत आले आणि तेथे सर्वांच्या समोर त्या दोघांनी नंदकुमार नखाते,बाळाराम नखाते यांनी संतोष वसंत पवार यांच्या म्हशींच्या तबेल्याबाबत तक्रार यापुढे करू नये अशी देखील धमकी जगडीश दगडे यांना देण्यात आली.
यानंतर लाडीवली गावातील ग्रामस्थ जगदीश दगडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.त्या तक्रारी नुसार कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम 504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.मलमूत्र आणि शेण रस्त्याने वाहुन जात असल्याबद्दल आवाज उठवणारे जगदिश हरिश्चंद्र दगडे हे पत्रकार असून युट्यूब वाहिनेचे संपादक आहेत.