कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर १३ मे,ते १६,मे २०२०,या कालावधीत कोरोना संदर्भात संपूर्ण आढावा घेउन पुढील प्रभावी उपाययोजनांची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मनपाचे सभागृह नेते मा,धिरज घाटे यांनी सांगितले,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता विविध उपाय योजना पुणे महानगरपालिका यशस्वीरीत्या राबवित आहे,
तथापि रोज प्राप्त होणारी आकडेवारी कशी कमी करता येईल, पुणे शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन सर्व शहरात करण्यात येणार असून त्यादृष्टीने क्षेत्रीय कार्यालय परिसरातील संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे,
आज हडपसर मुंढवा व नगररस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात येउन आढावा घेण्यात आला,
यामध्ये आजपर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना, मनुष्यबळ,मास्क,सॅनिटायजेर,किट्स,निर्जंतुकीकरण,रेशन वितरण,विलगिकरणाच्या व रुग्णालयातील व्यवस्था,उपाययोजनांच्या दृष्टीने पुढे नियोजनाकरिता दिशा ठरविणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला,व स्थानिक प्रभाग समिती अध्यक्ष,व सभासद,व संबंधित अधिकारी यांच्या सुचनांवरही नियोजन करण्यात येणार असल्याचे सभागृह नेते मा,धिरज घाटे,यांनी सांगितले,
हडपसर येथिल बैठकीप्रसंगी मा,उपमहापौर सौ,सरस्वती शेंडगे,प्रभाग समिती अध्यक्षा मा,सौ,पूजा कोद्रे,मा,सौ,वैशाली बनकर,मा,सौ,नंदा लोणकर,मा,मारुती तुपे,मा,योगेश ससाणे,मा,सौ,हेमलता मगर,मा,सौ,उज्वला जंगले,मा,संजय घुले,मा,गणेश ढोरे व सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप,क्षेत्रीय अधिकारी सुनील यादव व विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते,
नगररस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात बैठकीप्रसंगी मा,उपमहापौर सौ,सरस्वती शेंडगे,प्रभाग समिती अध्यक्षा मा,सौ,मुक्ता जगताप,मा,सौ,श्वेता गलांडे- खेसे,मा,सौ,सुनीता गलांडे,मा,राहुल भंडारे,मा,महेंद्र पठारे,मा,सौ,सुमन पठारे,मा,सौ,शीतल शिंदे,व अन्य सभासद,तसेच सहमहापालिका आयुक्त विजय दहीभाते,क्षेत्रीय अधिकारी,राजेश बनकर,व क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते,