जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना श्रध्दांजली* *जिल्हा प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना श्रध्दांजली*
*जिल्हा प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला*
पुणे, दि. 07 : पुण्याचे विद्यमान अतिरिक्त  जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. साहेबराव गायकवाड यांच्या निधनाने प्रशासनातील एक कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला, अशी शोकभावना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली.
 जिल्हाधिकारी राम आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जिल्हा प्रशासनात कार्यरत असतांना त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांची मोठी भूमिका होती.  अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून महसूल विभागात त्यांची ओळख होती. 
महसूल विभागातील अतिशय कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी हरपल्याने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हळहळ व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.