जागतिक स्तरावरील सुधारणेमुळे कच्चे तेल आणि सोन्याच्या किंमतीत वाढ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जागतिक स्तरावरील सुधारणेमुळे कच्चे तेल आणि सोन्याच्या किंमतीत वाढ


मुंबई, १ मे २०२०: जगभरातील विविध सरकारांनी लॉकडाऊन संपुष्टात आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यामुळे कमोडिटीबाबत गुंतवणूकदारांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. अमेरिका, न्यूझीलंड, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी त्यांची अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या योजनेची घोषणा केली असून यामुळे जागतिक कमोडिटीज मार्केटमध्ये सकारात्मक संकेत दिसत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


बुधवारी, स्पॉट गोल्डच्या किंमती ०.२२ टक्क्यांनी वाढल्या. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आज व्याज दर शून्यापर्यंत केले आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा सुधारण्यासाठी सर्व साधनांचा वापर करणार असल्याचे सांगितले. तथापि अनेक देशांमध्ये कोव्हिड-१९ च्या संभाव्य औषधोपचारांच्या अपेक्षेने लॉकडाउन मागे घेण्याची आशा निर्माण झाली. यामुळे गुंतवणुकदारांनाही जोखीम पत्करण्याची इच्छा होत असल्याने सेफ हेवन अॅसेट गोल्डकडील ओढा कमी झाला आहे.


स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.१२ टक्क्यांनी कमी नोंदल्या. त्या १५.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. तर एमसीएक्सच्या किंमती १.१५ टक्क्यांनी कमी होऊन ४१,७७५ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.


कच्च्या तेलाच्या किंमतीत भरघोस २२ टक्क्यांची वाढ झाली असून ते प्रति बॅरल १५.१ डॉलर या किंमतीवर बंद झाले. चीन आणि जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मागणीत सुधारणा होत असताना अमेरिकी क्रूड यादीच्या पातळीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्याने ही सुधारित स्थिती दिसत आहे. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या क्रूड यादीची पातळी ९ दशलक्ष बॅरलने वाढली तर बाजारपेठेत केवळ १०.६ दशलक्ष बॅरलची वाढ अपेक्षित होती. तथापि, कमकुवत जागतिक मागणी तसेच अमेरिकेची तेलाची साठवण क्षमता वेगाने संपत असल्यामुळे सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींचे चित्र चांगले नव्हते.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image