कर्जत शहरातील नागरिकांचे थर्मल स्कँनिंग...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.......


 


  


नागरिकांना मास्क आणि होमिओपॅथिक गोळ्या


 


कर्जत,ता.28 गणेश पवार


 


                       कर्जत शहरावर कोरोनाने वक्रदृष्टी दाखवल्याने शहरातील नागरिकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी पालिकेने उपाययोजना करीत जोरदार पावले उचलली आहेत. दरम्यान,शहरातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी पालिकेने सर्व नागरिकांचे थर्मल सकॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.तर पालिकेकडून सर्व नागरिकांना मास्क दिले जात असून होमिओपॅथिक गोळ्या देखील देण्यात येत आहेत.


 


                     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.शहरातील नागरिकांसाठी पालिकेने


 


नॅशनल कमिशन फॉर वुमेन आणि डीजीपी होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स यांच्यासोबत करार करीत नगरपरिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिक यांच्यासाठी विविध योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. त्यात शहरातील सर्व नागरिकांना मोफत मास्क दिले जात आहेत. पालिकेच्या सर्व प्रभागात होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्व नागरिकांचे थर्मल स्कँनिंग केले जात आहे.कर्जत नगरपरिषद हद्दीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्या भागात आढळला त्या दहिवली विभागातील संजय नगर परिसरातून या कॅम्पची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,विरोधी पक्षनेते शरद लाड,पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील,स्थानिक नगरसेवक विवेक दांडेकर,स्थानिक नगरसेविका सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे,तसेच नगरसेविका प्राची डेरवणकर,स्वामिनी मांजरे,नगरसेवक सोमनाथ ठोंबरे,बळवंत घुमरे,स्वीकृत नगरसेवक संकेत भासे,आदी उपस्थित होते.


 


                        यावेळी नॅशनल कमिशन फॉर वुमेन आणि डिजीपी होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्सचे डॉ. नितीन पावले,डॉ. राजाराम पवार, तसेच एफराज बॉम्बले हे वैद्यकीय पथक तपासणी करीत आहे.डॉ. साजिद सय्यद, कल्पेश जैन,दर्शन पोपट,संध्या फर्नांडिस,नसर शेख,डॉ. संगीता पाटील,शरीन अग्रवाल यांच्या समन्वय पथकाने देखील शहरात फिरून आरोग्य विषयक जनजागृती आणि माहिती देण्याचे काम केले. शहरातील सर्व नागरिकांची काळजी घेण्याचे काम करीत असल्याबद्दल शहरातील नागरिक हे मोठ्या प्रमाणात पालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत आणि आपल्याला असलेल्या लहानशा आजाराची देखील माहिती देत आहेत,अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली.


 


 


 


 


 


 


 


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image