रिअल हिरोंनी तयार केलं कोरोना जनजागृतीसाठी "मिलकर लढ़ना है हमे" हे गीत . . . 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, तो रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, शेतकरी असे अनेक रिअल हिरो कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील जीवाची बाजी लावून आपापले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. अश्यातच सर्व रिअल हिरोंनी एकत्र येऊन "मिलकर लढ़ना है हमे" हे गीत रसिकांसमोर आणलं आहे. 


 


महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सागर घोरपडे यांनी गायलेल्या या गीताला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गाण्यात अंगशुमन साहा (पोलीस उपायुक्त कोलकाता) तेजस्वि सातपुते (पोलीस अधिक्षक,सातारा) अतुल झेंडे (अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर) विजय चौधरी (स.पोलीस आयुक्त, पुणे क्राईम ब्रांच) बालाजी कुकडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, लातूर) वैशाली माळी, (पोलीस उपनिरीक्षक, मुंबई पोलीस) सागर घोरपडे, (पुणे पोलिस) वैभव बलकुंदे, (न्यूज रिपोर्टर), जगदीश त्रिवेदी, (हॉस्पिटल सेवा) सुषमा त्रिवेदी, (हॉस्पिटल सेवा) दत्ता गायकवाड (फार्मसिस्ट), प्रशांत लबडे पाटील, (एम एस ई बी कर्मचारी) सिमरन व्यास (डॉक्टर), प्रीती व्यास (फार्मसिस्ट), जयशंकर पाटील (शेतकरी), धीरज जाधव (शेतकरी), अजय यादव (बँक मॅनेजर) .... हे रिअल हिरो स्क्रीन वर दिसत असून, हे गाणं अमोल नाशिककर यांनी संगीतबद्ध केलं आहे तर गीतकार अमोल नाशिककर व अजय यादव हे असुन सागर घोरपडे व अमिता घुगरी यांनी गायलं आहे, गाण्याचे दिग्दर्शन अविराज जयशंकर यांनी केले असून संकल्पना अदिती त्रिवेदी यांची आहे. संकलन व पोस्टर अनिल शिंदे यांनी केले आहे. 


 


लोकांनी घरी राहून या संकटाशी सामना केला पाहिजे, आज ते सुरक्षित राहावे यासाठीच सर्व प्रशासन काम करते आहे, पोलीस कठोर कारवाई करताना दिसतात, यामागे सर्व सुरक्षित राहावे हीच भावना आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केले तरच या संकटाशी दोन हात करता येणे शक्य असल्याची भावना सागर घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केली