*'कोरोना'शी मुकाबला करीत* *रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा* *-उपमुख्यमंत्री अजित पवार*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*'कोरोना'शी मुकाबला करीत* 


*रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा*


    *-उपमुख्यमंत्री अजित पवार*


 


            पुणे,दि.२९: कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत.भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


              राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर -कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.


 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डाॕ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग,राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


  कोल्हापूर ,सांगली,सोलापूर,सातारा येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली.


    सातारा जिल्ह्यातील कराड-तासगांव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे. सातारा-कोरेगांव-मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. लोकांची सारखी मागणी असते,असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले,कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्या.खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे.


सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.


   टेंभुर्णी-पंढरपूर -मंगळवेढा-उमदी-विजापूर आणि अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.माढा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या,असे सांगितले.


  पुणे जिल्ह्यातील आढावा घेताना संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे.भूसंपादनातील त्रुटी दूर करा,मिळालेला निधी खर्च करा,असे सांगितले.


   नाशिक रोडवरील चाकण,राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते.तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्भवते.तेव्हा तेथील रुंदीकरणाचे काम करावे,असे श्री.पवार यांनी सांगितले.पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


 चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.


*****


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन