कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवा*             -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवा*
            -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


*पिंपरी-चिंचवड मधील प्रतिबंधित क्षेत्रांची डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी*


            पुणे, दिनांक १३: पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर वसाहत (‍चिंचवड स्टेशन ) व  रुपीनगर (तळवडे), भोसरी या प्रतिबंधित क्षेत्राला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली. कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.
  प्रतिबंधित क्षेत्राच्या पाहणी दरम्यान  महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीकारी डॉ. के. अनील रॉय, डॉ. पी.एच.ताडे, डॉ.रामनाथ बच्छाव, क्षेत्रीय अधीकारी आशादेवी, सहायक आरोग्य अधीकारी एम.एम.शींदे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
  पिंपरी- चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी कंटेन्मेंट क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करुन रुग्ण वाढू नयेत, यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी महापालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. 
            विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीवर भर द्यावा. प्रतिबंधीत क्षेत्रातील कोविड 19 सदृश्य लक्षणे आढळणा-या नागरिकांच्या तपासणीसाठी या परिसरानजीक कोविड फ्लू सेंटर सुरु करावे. याबरोबरच घरोघरी जावून नागरिकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करावे. सर्वेक्षण करतांना ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, श्वसनाशी ‍संबंधीत आजार असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी. या व्यक्तींच्या तपासणीसाठी शीबीर घ्यावे, असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करावे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या साफ-सफाईवर भर द्यावा, येथील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर पुरवावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करावा, जेणेकरुन येथील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. गृहभेटीव्दारे केलेल्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी वेळोवळी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. 
  महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना राबवण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशासनाच्या वतीने मदत करण्यात येईल, असे सांगून प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणालाही ये-जा करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. येथील रहिवाशांना  भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी असेही ते म्हणाले. 
  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. 
00000000000


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन