आणि गावोगावी सावली वाटत राहू...* विश्व मराठी परिषदेची सर्व मराठी बांधवांना नम्र विनंती...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*...


 


*सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराई या उपक्रमात सहभागी व्हा... आणि अस्सल मराठी निसर्ग संस्कृती जपायला सहयोग करा...*


 


मित्रांनो......


  


शेकडो वर्षांपासून उन्हाच्या झळा सोसणारी माणसं आपण... हे सगळं उन फक्त झाडांच्या जीवावर सोसत आलोय आपण आणि आपले पूर्वज... त्यातही एका झाडाची सावली उन्हाळ्यात जास्तच गोड वाटते. बरोबर ओळखलं. आंब्याचं झाड. दुर्दैवाने नव्या पिढीला आंब्याच्या अस्सल देशी जाती माहितीही होत नाहीत. खायला मिळणे तर खूप लांबची गोष्ट. शेप्या, लालपरी, गोटीआंबा, रायवळ, खारीकआंबा, कागद्या, लोणच्या, केसर, शेंदरया, नारळया, बिटका, केळ्या, गाडग्या अशी कितीतरी नावं होती आपल्या लहानपणी. यातल्या ठराविक झाडाच्या कैऱ्यांचाच खार व्हायचा.


 


आता तुम्ही म्हणाल नारळया आणि खोबऱ्या एकच. पण नाही तसं नाही... नारळया आकाराने नारळाएवढा असतो. तर खोबऱ्या चवीला खोबऱ्यासारखा असतो. हे सगळं आपलं वैभव होतं. कमी तेल वापरून मुरलेला खार अजूनही जिभेवर आहे. त्याला सुटलेलं पाणी भाकरीला घोळसून खाण्यात काय मजा होती. या सगळ्या आठवणी राहिल्यात...


 


आपली संस्कृती जपायची म्हणजे निबंध नसतात जपायचे. किंवा मेसेज नसतात फॉरवर्ड करायचे. आपली अस्सल झाडं जपायची असतात. ती आपली आणि आपल्या मातीची खरी ओळख असते. 


 


मग या महिन्यात जेवढ्या वेगवेगळ्या देशी आंब्याच्या कोयी गोळा करता येतील त्या करा. जपून ठेवा. सह्याद्री देवराईचे तुमच्या भागातले वृक्षमित्र त्या गोळा करण्याची जवाबदारी घेतील. अर्थात फक्त कोय द्यायची नाही. तिची माहिती द्यायची. कोय कोणत्या प्रकारची आहे? त्या आंब्याला तुमच्या भागात काय म्हणतात? आंबा कुणी लावला होता हे माहित असलं तर अधिक उत्तम. ज्याचं श्रेय त्याला द्यायला पाहिजे. आणि ही झाडं लावणाऱ्या माणसांची नावं जगाला कळायला पाहिजेत. 


 


तर मित्रांनो, ही सगळी माहिती आणि कोय गोळा करा. तसेच तुमच्या मित्रांनादेखील ही माहिती पाठवा व यात सहभागी व्हायला सांगा. 


 


*३० मे पर्यंत कोया गोळा करून, ८ जून पर्यंत त्या वाळवून, १२ जून पर्यंत खाली दिलेल्या नंबर वर आपल्या वृक्षप्रेमी मित्रांना संपर्क करा.*


       


का करायचं हे सारं? तर तुम्ही दिलेल्या कोयापासून आपण रोपे तयार करू या, ती वाढवू या आणि जपूया.


 


 मित्रांनो... *भेटत राहू... आणि गावोगावी सावली वाटत राहू* .


 


आपला 


 


 सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप    


 *सह्याद्री देवराई*


संपर्क -१)सुहास वाईंगनकर:-९४२१२९०११२ 


२) विजय निंबाळकर - ८२७५३६९३८३


३) धनंजय शेडबाळे - ९८२२३९४६७०


 ४) रघुनाथ ढोले - ९८२२२४५६४५


 


सौजन्य - विश्व मराठी परिषद


कृपया संकेतस्थळाला भेट द्या ही विनंती


www.vishwamarathiparishad. org


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन