मेटल आणि वाहन क्षेत्राने केले शेअर बाजाराचे नेतृत्व.. एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मेटल आणि वाहन क्षेत्राने केले शेअर बाजाराचे नेतृत्व


मुंबई, १ मे २०२०: गुरुवारी सेन्सेक्स तब्बल ९९७ अंकांची उडी घेत ३.०५ टक्के उंचीवर ३३,७१७ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०नेही दिवसभराच्या बाजारात ३.२१ टक्क्यांची म्हणजेच १४० अंकांची वाढ घेत १०,००० अंकांवर बंद झाला. मेटल आणि वाहन क्षेत्राने शेअर बाजारातील नफ्याचे नेतृत्व केल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


ब्ल्यूचिप स्टॉकमध्ये टाटा मोटर्सने आज निफ्टीमध्ये १९.३१ टक्क्यांची वाढ घेतली. त्यानंतर युनायटेड फॉस्फरसने १६.४९ टक्के, ओएनजीसीने १३.३३ टक्के तसेच वेदांताने १३.१४ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. निफ्टीने ४३ स्टॉकमध्ये प्रगती दर्शवली तर ७ स्टाॅक घसरले. आजच्या लूझर्समध्ये सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, सिपला आणि इंडसइंड बँकेसह इतरांचा समावेश होता.


बीएसईच्या ३०-स्टॉक बेंचमार्क इन्डेक्समध्ये ओएनजीसीने लाभार्थ्यांचे नेतृत्व केले. त्यानंतर एचसीएल टेक्नोलॉजीने १०.४४ टक्के, हिरो मोटोकॉर्ने ९.९४ टक्के आणि टीसीएस व मारुती सुझुकीने प्रत्येकी ५.७६ टक्क्यांची बढत घेतली. बीएसई मेटल इंडेक्समधील सर्व मेटल स्टॉक्सने तसेच निफ्टी ऑटोतील सर्व १६ स्टॉक्सनी वृद्धी दर्शवली.


ग्लोबल मार्केट्समध्येही दिसली वाढ:


आज भारतीय स्टॉक एक्सचेंजमधील वाढीचे श्रेय अनेक सकारात्मक घटकांना द्यावे लागेल. त्यातील प्रमुख कारण म्हणजे कोरोना व्हायरसच्या केसेस कमी होत आहेत आणि त्यानंतरच्या थोडी विश्रांतीची आशा दिसत आहे. भारतातच ३०० कोव्हिड मुक्त जिल्व्हे असून इतर ३०० जिल्ह्यांमध्ये खूप कमी रुग्ण आहेत. भारत ४ मे नंतर हळू हळू लॉकडाउनच्या बाहेर येऊ लागेल. त्याचबरोबर एफअँड ओच्या समाप्तीने मार्केटला आणखी वेग मिळाला. मल्टिपल एशियन स्टॉक्सनीही ७ आठवड्यातील उच्चांकाला स्पर्श करुन वेगात भर पाडली. गुंतवणूकदारदेखील चीनच्या पीएमआय डेटामुळे खुश आहेत. मार्चमध्ये ५२ अंकांवरून ५०.२ अंकांवर घट होऊनही उत्पादनाच्या क्षेत्रात दुसऱ्या महिन्यात विस्ताराची नोंद दिसली.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image