कच्च्या तेलाच्या किंमतीत १३ टक्क्यांनी वाढ: एंजल ब्रोकिंग

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, २६ मे २०२०: मागील आठवड्यात विविध ठिकाणचे आर्थिक कामकाज सुरू झाल्यामुळे डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किंमती १३ टक्क्यांनी वाढल्या. घटत्या मागणीवर उपाय म्हणून ओपेक आणि सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात आक्रमक पद्धतीने कपात केली. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. याविषयी जाहीर झालेल्या अहवालांनुसार, ओपेक पुढील बराच काळ उत्पादनातील कपात कायम ठेलेल जेणेकरून तेलाला चांगला भाव मिळेल.


 


एनर्जी इन्फॉर्एशन अॅडमिनिस्ट्रेशनने ५ दशलक्ष बॅरलची मोठी घट दर्शवली. प्रमुख अर्थव्यवस्थांमधील वाढते व्यापारी तणाव तसेच हवाई, रस्ते वाहतुकीवरील निर्बंध यांमुळे तेलाच्या किंमतींवरील लाभ मर्यादित राहिला.


 


मागील आठवड्यात मध्यवर्ती बँकांनी आक्रमक मदतीचे पॅकेज जाहीर केले तसेच अमेरिका, चीन आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या धोरणांमु‌ळे सोन्याच्या किंमती ०.२ टक्क्यांनी घसरल्या. प्रमुख अर्थव्यवस्थांमधील लॉकडाउन शिथिल केल्याने बाजाराच्या भावनांना आधार मिळाला व पिवळ्या धातूच्या किंमतीत घसरण झाली.


 


जागतिक इक्विटी आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची भूकही वाढली. अमेरिका-चीनदरम्यानचा तणाव तसेच नवी, प्रभावी लस तयार करण्याच्या स्पर्धेमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला व किंमती कमी होण्यावर मर्यादा आल्या.


 


मागील आठवड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ०.१५ टक्के वाढून १७.२ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमतदेखील १.१७ टक्क्यांनी वाढून ४८, २,५७ रुपये प्रति किलो एवढी वाढली