विविध देशांतील लॉकडाउन शिथिलतेमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विविध देशांतील लॉकडाउन शिथिलतेमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ


मुंबई, ७ मे २०२०: कोरोना व्हारयसभोवतीची भीती कमी झाल्यामुळे जगातील विविध देशांनी उत्पादन व निर्मिती प्रकल्प काही प्रमाणात सुरू केले आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की जगातील लॉकडाउनमुळे सर्व महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमधील उत्पादन क्षमता थांबली होती, त्यामुळे कमोडिटीजच्या किंमतींवर तणाव निर्माण झाला होता. मात्र आता उत्पादनात तत्काळ वेगाने सुधारणा होण्याच्या आशेमुळे संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये मागणीला जोर येईल.


मंगळवारी, अनेक देशांमध्ये लाकॅडाउनमध्ये शिथिलता आल्याची घोषणा झाल्याने स्पॉट गोल्डच्या किंमती काही प्रमाणात म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वाढून १७०६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. मार्केटच्या विश्लेषणानुसार, लॉकडाऊननंतरची मार्केटची सुधारणा अपेक्षेपेक्षा जास्त संथ आणि विलंबाने होईल. त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर आणखी परिणाम होईल. डॉलरच्या वाढती तादतीमुळे इतर चलधारक देशांना सोन्याच्या किंमती महाग पडू शकतात.


स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.२१ टक्क्यांनी वाढून १५.० डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवर या किंमती काही प्रमाणात म्हणजेच ०.२१ टक्के वाढून ४१,००५ रुपये प्रति किलोने वाढलेल्या दिसल्या.


कच्च्या तेलाच्या किंमती २०.४ टक्क्यांनी वाढून २४.५ डॉलर प्रति बॅरलवर थांबल्या. अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेले कठोर लॉकडाउन काढण्याच्या योजना राबवल्याने कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा पूर्वस्थितीत येण्यास मदत होत आहे. युरोपियन आणि आशियातील बऱ्याच देशांनी व अमेरिकेतील राज्यांनी काही टक्के मजूर कामावर जाऊ शकतात, अशी परवानगी दिली आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यालये पुन्हा सुरु होणार असल्याने वाहनांची वाहतूकही वाढेल, अशी आशा आहे. वाहतूक वाल्याने कच्च्या तेलाची मागणीही वाढेल.


ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलिअम एक्सपोर्टिंग कंट्रिज अर्थात ओपेक संघटनेने १ मे २०२० रोजी दररोज ९.७ दशलक्ष बॅरल एवढे उत्पादन कपात करण्याचा निर्णय घेतल्याने तेलाच्या किंमतींत वाढ होण्यास मदत झाली. अमेरिकन पेट्रोलिअम इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीने गेल्या आठवड्यात दररोज ८.४ दशलक्ष बॅरलची वाढ केली. यामु‌ळेही कच्च्या तेलाच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image