टीसीआय एक्स्प्रेसच्या नफ्यात १२.५ टक्क्यांची घट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


टीसीआय एक्स्प्रेसच्या नफ्यात १२.५ टक्क्यांची घट


मुंबई, १२ मे २०२०: भारतात एक्स्प्रेस लॉजीस्टिक सेवा आणि वितरणातील आघाडीची कंपनी टीसीआयएक्स्प्रेसने ३१ मार्च २०२० रोजी समाप्त होणा-या तिमाही आणि वर्षाचे आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत. कंपनीने २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत १९ कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे जी गेल्या आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत २२ कोटी नफा वृद्धीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांनी कमी आहे.  


कंपनीने या वर्षी मार्चमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत २३८ कोटींच्या उलाढालीची नोंद केली आहे जी २०१८-१९च्या अंतिम तिमाहीमधील एकूण उत्पन्नाच्या १०.५ टक्क्यांनी कमी आहे. कंपनीने वर्ष २०१९-२० मध्ये ८९ कोटी रुपयांच्या पीएटीची (लाभ) नोंद केली आहे जी गेल्या वर्षी ७३ कोटी पीएटीच्या तुलनेत २२.३ टक्के अधिक आहे. कंपनीने आर्थिक वर्ष १९ मध्ये १०२४ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली होती जी या वर्षी मार्चमध्ये समाप्त आर्थिक वर्षात ०.८ टक्क्यांनी वाढून १०३२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीद्वारे आर्थिक वर्ष २०२० साठी प्रत्येक शेअरवर ४ रुपये अंतिम लाभांशाची घोषणा करण्यात आली आहे.


टीसीआय एक्स्प्रेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चंदर अग्रवाल म्हणाले, ' कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे मार्च २०२० मध्ये आमच्या व्यापारावर परिणाम झाला. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल साध्या स्वरुपात म्हणजेच १,०३२ कोटी रुपये राहिला. आम्ही १२%च्या स्थिर मार्जिनसहित १२६ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए दिला. वित्तवर्ष २०२० मध्ये कर चुकवल्यानंतर ८९ कोटी रुपयांचा नफा झाला. जो वर्ष ते वर्ष या आधारे २२ % ची वृद्धी दर्शवतो. आमचे स्थिर मार्जिन प्रोफाइल हे उच्च क्षमतेचा वापर, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि कुशल कार्यरत भांडवल व्यवस्थापन या वैशिष्ट्यांपासून तयार झाले आहे. वित्तवर्ष २०२० मध्ये आम्ही जी गती मिळवली होती, ती मार्च २०२० मध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे गमावली. आंतर राज्यीय हालचालींसह कारखाने आणि कार्यालये बंद असल्यामुळे परिवहन आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर स्पष्ट प्रभाव पडला. देशव्यापी लॉकडाउनमुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला तरी आम्ही सरकारने घेतलेल्या निर्णयांना पूर्णपणे पाठींबा देत आहोत.'