शनिवार पेठ येथे राहणाऱ्या पाच वर्षीय कार्तिक खलाणे या विद्यार्थ्याकडून सर्वसामान्य जनतेस घरी रहा सुरक्षित रहा असा संदेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


शनिवार पेठ येथे राहणाऱ्या पाच वर्षीय कार्तिक खलाणे या विद्यार्थ्याकडून सर्वसामान्य जनतेस घरी रहा सुरक्षित रहा असा संदेश

         भारत देशात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढतच आहे यातच पुणे शहर आणि मुंबई येथील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे.

     यासाठी उपाय म्हणून एकमेव मार्ग म्हणजे जनतेने घरातच राहिले पाहिजे असे आवाहन भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे वेळोवेळी जनतेस करत आहेत. या आवाहनास प्रतिसाद म्हणून तसेच जनतेच्या हितासाठी शनिवार पेठेतील कार्तिक धनंजय खलाने या पाच वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या घरातूनच जनतेस घरी रहा,  सुरक्षित रहा असे आवाहन केले आहे. कार्तिक खलाने हा डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळेच्या जूनियर के.जी. मध्ये शिकत आहे. 

     सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून आपण हा संदेश देऊया या भावनेने त्याने हा संदेश दिला असल्याची भावना कार्तिक चे वडील धनंजय व आई मोनिका यांनी व्यक्त केली.