जमिनी पातळीवरचे प्रश्न प्राथमिक तिने सोडवले पाहिजेत तरच या घोषणा प्रत्यक्षात अमलात येऊ शकतील देवीदास तुळजापूरकर जॉइंट सेक्रेटरी AIBEA

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रसिद्धीसाठी        


भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आज छोटे उद्योग, मध्यम उद्योग,सूक्ष्म उद्योग, बिगर बँकिंग वित्तीय संस्था तसेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन यासंदर्भात काही महत्वपूर्ण घोषणा केल्या यामुळे त्या या क्षेत्राचे पुनरुज्जीवन होण्यास निश्चितच मदत होणार आहे


पण हा उद्योग जे उत्पादन किंवा सेवा उपलब्ध करून देतो त्याला जर मागणी आली नाही तर याचा काहीच उपयोग होणार नाही यासाठी सुरुवातीला बाजाराचे पुनरुज्जीवन व्हायला हवे तरच मागणी वाढेल याशिवाय या घोषणा ज्या बँकिंग व्यवस्थेमार्फत अमलात आणल्या जाणार आहेत ती बँकिंग व्यवस्था आज थकित कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. याशिवाय या बँकांमध्ये व्यवस्थापन सीबीआय तसेच सी व्हीसी यांच्या चौकशीच्या तणावाखाली काम करत आहे तसेच बँकिंग उद्योगात जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती केली जाणार नाही तोपर्यंत जमिनी पातळीवर या धोरणात्मक निर्णयांची ची अंमलबजावणी शक्य होणार नाही आणि म्हणूनच वित्तमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचे स्वागत करत असतानाच आम्ही असे आवाहन करतो की त्यांनी जमिनी पातळीवरचे प्रश्न प्राथमिक तिने सोडवले पाहिजेत तरच या घोषणा प्रत्यक्षात अमलात येऊ शकतील
देवीदास तुळजापूरकर
जॉइंट सेक्रेटरी
AIBEA


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image