बळीराजाच्या मदतीला धावून गेले 'साहेब'.


बळीराजाच्या मदतीला धावून गेले 'साहेब' ■ चटप साहेब खरे शेतकरी मित्र आज कडाक्याच्या उन्हात ४६.७℃ तापमानात चंद्रपुर-आदिलाबाद महामार्ग शेतकऱ्यांनी रोकला. सीसीआयने शेवटच्या बोंडापर्यंत हमीभावाने कापूस खरेदी करावी, ही मागणी शेतकऱ्यांनी केली. लॉकडाउन काळात प्रशासकीय नियम पळून अ‍ॅड. चटप यांच्या नेतृत्वात गावोगावी शेतकऱ्यांनी मुठभर कापूस जलाओ आंदोलन केले होते. तरी देखील सरकार जागे न झाल्याने अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पेरणीचा हंगाम जवळ येऊन अद्याप कापूस खरेदी न झाल्याने हतबल झालेल्या शेतकरी राजाने आज रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोणताही बडा नेता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही . मात्र कडाक्याच्या उन्हात देखील चटप साहेब आंदोलनाच्या ठिकाणी हजर झाले . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांची चर्चा केली. शेतकऱ्यांशी वार्तालाप करून हे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे अशी मागणी देखील केली. आपल्या संकटाच्या काळात जो धावून येतो तोच खरा मित्र त्यामुळे चटप साहेब खऱ्या अर्थाने शेतकरी मित्र ठरले आहेत.