महसूलच हवा असेल तर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्या*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट
*महसूलच हवा असेल तर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्या*                                      ---------------------                                                                                                                   *लोकजनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* 


पुणे :


 'कोरोना विषाणू साथीच्या प्रतिकूल परिस्थितीत महसुलच हवा असेल तर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्या 'अशी मागणी रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. पक्षाच्या पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे  यांनी शुक्रवारी हे पत्र मेल द्वारे पाठवून मागणी केली आहे. या आधी लोकजनशक्ती पक्षाने मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यास विरोध दर्शवला होता . 
 'कोरोना विषाणू साथीच्या प्रतिकूल परिस्थितीत राज्याला महसुलाची चणचण भासणे अगदी साहजिक आहे,मात्र त्यासाठी मद्य विक्री दुकाने सुरु ठेवण्यासारखे धोकादायक निर्णय घेण्यापेक्षा महसूल वाढीचे अन्य पर्याय तपासावेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासारख्या अनेक निर्णयातून महसूल वाढीचा उद्देश साध्य होवू शकतो ,असे लोकजनशक्ती पक्षाने  या पत्रात म्हटले आहे . 
राज्यात अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी प्रलंबित आहे. राज्यातील उपनगरात गरीब आणि मध्यम वर्गीयानी केलेली बांधकामे ,गुंठेवारी नियमित केल्यास आणि ती प्रक्रिया ऑन लाईन ,गतिमान केल्यास राज्याच्या तातडीच्या महसुलाची गरज भागू शकेल ,असे संजय अल्हाट यांनी म्हटले आहे. फक्त पुणे जिल्ह्यातच अशी  ३५ हजार हून अधिक प्रकरणे विचाराधीन आहेत ,नवी आकडेवारी तपासून स्थानिक संदर्भ तपासून निर्णय घेणे शक्य आहे ,असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे .                                                                                                                         -----------------