पुणे विभागातून इतर राज्यात व जिल्हयांमध्ये  जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजुरांनी घाबरुन जावून नये                                         - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागातून इतर राज्यात व जिल्हयांमध्ये 
जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजुरांनी घाबरुन जावून नये
                                        - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती


  पुणे दि 4: पुणे विभागातून इतर राज्यांत किंवा इतर जिल्हयांमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजूरांनी घाबरुन जावू नये, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  पुणे विभागात अडकलेल्यांना ज्या भागात जावयाचे आहे त्यांना त्यांच्या भागाची स्वीकृती देणे अपेक्षीत आहे. जी व्यक्ती किंवा ग्रुप जावू इच्छितो त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र चालू शकतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या समोर अनावश्यक गर्दी टाळावी. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण अर्ज पाठवावा. अर्ज पाठविल्यानंतर तो अर्ज संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे जाईल. जेथे जावू इच्छीता त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज पाठविण्यात येईल. त्यांची संमत्ती मिळाल्यावरच जाण्यास परवानगी दिली जाईल. अशी परवानगी देतांना त्यांनी स्वत: जाण्याची व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. काही ठिकाणी राज्य शासन व केंद्र शासन जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे रेल्वेची व्यवस्था केली जावून शकते. परंतु त्याबाबतीत केसनिहाय निर्णय होईल्. म्हणून माझी सर्वांना पुन्हा कळकळीची विंनती आहे की  विनाकारण, अनावश्यक गर्दी टाळावी. आजपर्यंत आपण सोशल डिस्नसिंग व लॉकडाऊन मुळे जे काही प्राप्त केलय त्याचे विनाकारण नुकसान होईल असे कुठलीही कृती करु नये, असेही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे.
0000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image