शिक्षकांना किराणा माल घरपोच पोहचविण्याची जबाबदारी, बीड जिल्ह्यात आदेश.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


शिक्षकांना किराणा माल घरपोच पोहचविण्याची जबाबदारी, बीड जिल्ह्यात आदेश.....


शिक्षक वर्गात नाराजीचा सुर


कर्जत,ता.27 गणेश पवार


                            कोरोना संकटाच्या काळात शिक्षक वर्गावर अनेक प्रकारची कामे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.त्यात शिक्षक वर्गाला जिल्हा सीमा बंदीसह पोलिसांसोबत विविध प्रकारच्या बंदोबस्तात त्यांना मदत करण्याची जबाबदारी शासनाने दिली आहे.हे सुरू असताना शिक्षकांवर बीड जिल्ह्यात किराणा सामान आणि जीवनावश्यक वस्तू घरी पोहचविण्याची जबाबदारी दिली आहे.दरम्यान, प्रशासनाने हा निर्णय बदलावा अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.


                        कोरोना साथरोग नियंत्रण कार्यात राज्यातील सर्वच शिक्षक यांना राज्य सरकार आणि प्रशासन कुठलेही विमा संरक्षण आणि सुरक्षेची साधने देत नाहीत. असे असताना शिक्षक वर्ग स्वतः झोकून देवून जनजागृती,सर्व्हेक्षण आदी कार्यात कर्तव्य बजावत आहेत.आज राज्यातील सर्व शाळा बंद असतानाही शिक्षक आपले विदयार्थी-पालक, यांच्या सोबत ऑनलाईन किंवा फ़ोनद्वारे संपर्क साधुन आहेत. नित्यनियमितपणे आपले पवित्र ज्ञानदानाचे कार्य करत असताना शिक्षक वर्ग साथरोग आपत्ती मध्ये देखील सहभागी होत आहेत.


                         असे असताना राज्यातील विविध तहसील कार्यालय,पंचायत समिती, किंवा ग्रामपंचायत कार्यालया मधुन शिक्षकांना आपत्ती कालावधीत विविध कामे दिली जात आहेत. त्यामुळे शिक्षक वर्गात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.सध्याच्या आपत्तीच्या कालावधीत शिक्षकांनी नक्की काय करावे? आणि ऐकावे ? अशी संभ्रमावस्था शिक्षक वर्गात निर्माण झालेली आहे, याबाबत कामांची यादी (जॉब चार्ट) जाहीर करण्याचे आदेश मंत्रालयीन स्तरावरुन देण्यात यावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघ संलग्न जुनी पेंशन संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र फुलावरे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे केलेली आहे.हे सुरू असताना बीड जिल्ह्यातील एका तालुक्यातील पंचायत समिटीई शिक्षकांना जिवनावश्यक वस्तू,किराणा माल घर पोच करण्यासाठी आदेश दिलेले आहेत.त्यामुळे विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षक वर्गावर आणखी कोणती कामे करावी लागतील असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.


                            शिक्षकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल अशी आवश्यक ती साधने प्रशासनाकडून पुरवली गेलेली नाहीत.शिवाय दारात किराणा माल घेवून आलेले आपले गुरुजी हे चित्र देखील पुरोगामी महाराष्ट्र राज्यासाठी भूषणावह नाही. हे चित्र समाज मनास न पटणारे आणि आपल्या गुरुची प्रतिमा कमी करणारे आहे.म्हणून किराणा माल घर पोहोच करण्याचे आदेश रद्द करण्याबाबत शिक्षक संघ आक्रमक असून त्यांनी राज्य सरकारकडे विनंती केलेली आहे.