पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी  विभागात कोरोना बाधित 2 हजार 734 रुग्ण                                               -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 2 हजार 734 रुग्ण
                                              -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
  
    पुणे दि. 7 :- पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण  142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 94 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार  395  बाधीत रुग्ण असून  680  कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 587 आहे. कोरोनाबाधित एकूण  128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  88  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
  सातारा जिल्हयातील  113  कोरोना बाधीत रुग्ण असून  14  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  97 आहे. कोरोनाबाधित एकूण  2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील  176  कोरोना बाधीत रुग्ण असून  24  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  142 आहे. कोरोनाबाधित एकूण  10  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील  35 कोरोना बाधीत रुग्ण असून  26  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  15 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 आजपर्यत विभागामध्ये एकुण 27  हजार 429  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 26 हजार 301 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 186  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  23  हजार  509  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  2   हजार 734   चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  
आजपर्यंत विभागामधील  82 लाख 12 हजार 122 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 26 लाख 74 हजार 234  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 956   व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. 
                                 0000