कोरोना -  नागरिकांच्या प्रवास नियोजनासाठी  अधिकारी नियुक्त                    - जिल्हाधिकारी राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना -  नागरिकांच्या प्रवास नियोजनासाठी  अधिकारी नियुक्त
                   - जिल्हाधिकारी राम
पुणे दि.11 : -  कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात विस्थापित कामगार, यात्रेकरु,पर्यटक,विद्याथी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाकरिता नियोजनासाठी अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.


                     आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नमूद व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करणे अगत्याचे झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम  यांनी सांगितले आहे


                 पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये अधिकाऱ्यांची  पुढील आदेशापर्यंत निश्चित नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( मो.नं.9423043030) यांच्याकडे पुणे जिल्हयामध्ये  बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांच्या संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडून यादी प्राप्त करुन घेणे तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे. तसेच त्या संबंधित राज्याकडून परवानगी घेणे,परवानगी पत्र तयार करुन घेणे व त्यांना संबंधित राज्यामध्ये पाठविण्यासाठी बस, रेल्वे  याबाबतची व्यवस्था करणे इ.जबाबदारी देण्यात आली आहे.


  उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे ( मो.नं.9075748361) यांच्याकडे पुणे महानगरपालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे. उपजिल्हाधिकारी, नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय, पुणे हिम्मत खराडे ( मो.नं.9422072572) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड  महानगरपालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे.


  उपजिल्हाधिकारी,भूसंपादन क्र.17  आरती भोसले  ( मो.नं.9822332298) यांच्याकडे ग्रामीण हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे तर सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्थलांतरित कामगारांना पुणे जिल्हयातून इतर जिल्हयात जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करुन संबंधित जिल्हयाकडून परवानगी प्राप्त करुन घेऊन संबंधितांना त्या त्या जिल्हयामध्ये पाठविणेकामी बसेसची व्यवस्था करणे, तसेच पुणे जिल्हयातून बाहेरच्या राज्यामध्ये जाणा-या स्थलांतरित कामगारांची यादी संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम  यांनी दिले.