जेव्हा आठवतात, मातापित्यांच्या छत्रछायेचे दिवस

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


. . *जेव्हा* . . 


 


  ,आणि पहातो शाळेत जाणारी बालके . . .  


जेव्हा आठवतो लपंडाव, रुमालपाणी ,कागदी नाव आणि सापशिडी . ..  


जेव्हा ऑनलाईनच्या युगात आठवते, आयूष्यातील पहिली कमाई, आणि जमाखर्चाची स्वप्ने . . 


जेव्हा पहातो मंगलकार्यातून, फुलांनी सजवलेल्या गाडीतून, देवदर्शनाला जाणारे नवदाम्पत्य . . .


   जेव्हा रांगणारे, हसणारे, रडणारे मूल,फुलपाखराच्या पंखासारखे हात पसरून, नजरेनेच मला घ्या . . म्हणते ! . . .  


जेव्हा माणसांनी गजबजलेल्या चाळी आणि वाड्यांच्या जागी, टाऊनशीप उभ्या रहातात आणि गेटवर आल्या गेल्यांची नोंद होते . . .  


तेव्हा वाटते, घड्याळाचे काटे उलटे फिरवता आले तर . . . 


   घड्याळ जेव्हा आठवते, तेव्हा शाळेच्या मधल्या सुट्टीत जातो, हौदावर ओंजळीने पाणी पितो. . . 


   काळाच्या ओघात, टिकून राहिलेल्या एखाद्या चिरेबंदी वाड्यात फिरून, पाऊलखुणांचे स्मरण करतो !


प्रत्येक पगाराचा चेक, अजूनही देवासमोर ठेवतो ! 


देवदर्शनासाठी आलेल्या नवपरिणीतांना दुरूनच, मनोमन आशिर्वाद देतो ! 


संध्याकाळी दूरवरून येणारे, मंदीरातील घनगंभीर घंटानाद ऐकतो . . . 


आकाशातील रंगांचा खेळ, झाडांचे बहर पानगळ, आणि समुद्राच्या उसळणा-या लाटा पहातो, तेव्हा . . .


घड्याळा ऐवजी, कालचक्राचाच विचार आता मनात येतो ! . . . 


 


😌😌🤷🏻‍♂️😌😌


  *आनंद सराफ*