तीन महिन्याचे 'वीज बिल' माफ करा...* - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*तीन महिन्याचे 'वीज बिल' माफ करा...*
- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड


*पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात* कोरोनाचे संकट महाभयानक आहे. त्यात पुणे रेडझोन मध्ये असल्याने परिस्थिती अत्यंत प्रचंड कठीण काळ आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांसह छोटे उद्योग व्यवसाय अडचणीत आले असून दैनंदिन जीवन व्यवस्था उध्वस्त झालेली आहे. अशा काळात बहुतेक लोक स्वतः भाड्याने राहत आहेत किंवा त्यांचे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय हे भाड्याच्या दुकानांमध्ये सुरू आहेत. असे लोक या लाॕकडाऊन या काळामध्ये प्रचंड अडचणीत आहेत. म्हणून राज्य सरकार व मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने विनंती आहे की, *लाॕकडाऊन जाहीर झाल्या पासून अर्थात मार्च २०२० पासून मे २०२० महिन्यापर्यंतची सर्व 'लाईट बिल' माफ करावेत... अशी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.* याबाबतची मागणी चे पत्र आपणास व आपल्या कार्यालयात आम्ही  ई-मेल द्वारे पाठवत आहे.


*महाराष्ट्रात पुणे जिल्हा* औद्योगिक उन्नतीसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. कामगारांचा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक उद्योग व्यवसायासाठी व शिक्षण आणि इतर कारणासाठी पुणे शहर व जिल्ह्यात वास्तव्यासाठी आहेत. शेतकरी, छोटे अर्थात लघु उद्योग - व्यवसाय या लाॕकडाऊन बंद आहेत म्हणून सरसकट महाराष्ट्रातील सर्वांना ३ महिन्याचे 'वीज बिल' 'माफ' करावे अशी राज्य सरकारला विनंती आहे.


*विधानसभेच्या काळात* काँग्रेसने 100 युनिटपर्यंत विज बिल माफ करू असे जाहीरनाम्यात सह भाषणामध्ये जाहीर केलेले आहे. मात्र सत्तेवर येऊन सुध्दा आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. दिल्लीमध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा 100 युनिटपर्यंत वीज सर्वांना सरसगट मोफत मिळाली पाहिजे. मात्र सध्या कोरोनाचे संकट भयानक व महामारी स्वरूपात असल्यामुळे सर्व जण अत्यंत अस्वस्थ आहेत. त्यामुळे कोरोना महामारी च्या धर्तीवर मार्च महिन्यापासून ३ महिन्याचे सर्वांचे लाईट बिल अर्थात 'वीज बिल माफ' करावे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती वजा मागणी आहे.


*- संतोष शिंदे,*
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
9850842703 


प्रत - 
१)  मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा
२) मा. नितीन राऊत, उर्जामंत्री, महाराष्ट्र
३) मा. जिल्हाधिकारी, पुणे


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image