वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही  - जिल्हाधिकारी राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही  - जिल्हाधिकारी राम


पुणे- जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. अशाच उपाययोजनांतर्गत वाशिम जिल्ह्यातील  मानोरा तालुक्यातील 
 38 मजुरांना दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी थांबविण्यात आले होते. या व्यक्तींची मौजे कोरेगाव भिमा येथे अल अमीन कॉलेजवरती राहण्याची, जेवण्याची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली होती. तसेच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. राज्य शासनाने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची प्रक्रिया निश्चित करुन दिल्यानंतर वाशिम जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेवून त्यांना दिनांक 4 मे रोजी  त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींना दिनांक 5 मे 2020 रोजी सुखरुप त्यांच्या घरी पोहचविण्यात आले. शिरूर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे  उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख,  शिरूरच्या तहसिलदार
 लैला शेख यांनी पार पाडली.