पुणे विभागात 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461 क्विंटल भाजीपाल्याची आवक                                                       -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागात 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर
8 हजार 461 क्विंटल भाजीपाल्याची आवक
                                                      -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि.8 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 1 हजार 845 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 17 हजार 696 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 7 मे 2020 रोजी  101.800 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.215 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


पुणे विभागात 28 हजार 658 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 458 मजुरांना भोजन


       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 148 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 167 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 383 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 28 हजार 658 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  458 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image