विभागात कोरोना बाधित 3 हजार 365 रुग्ण                                               -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 3 हजार 365 रुग्ण
                                              -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


      पुणे दि.11 :- पुणे विभागातील 1 हजार 237  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1  हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  115 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 926  बाधीत रुग्ण असून  1 हजार 139   कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 630  आहे. कोरोनाबाधित एकूण 157  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच     107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
  सातारा जिल्हयातील 119  कोरोना बाधीत रुग्ण असून 20  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 264 कोरोना बाधीत रुग्ण असून  41  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण  14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 38   कोरोना बाधीत रुग्ण असून 28  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 हजार 64 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32  हजार  366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 671  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी    28 हजार 969  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  3   हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  
              आजपर्यंत विभागामधील 92 लाख 99 हजार 876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 2 लाख 32 हजार 714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 176  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भीत करण्यात आले आहे.
 परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण :  
दि.10.05.2020 रोजी परदेशातून एकूण 141 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. 
 परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : -  
       दि. 11.05.2020 रोजी दु. 4.00 वा. पर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी - 4, उत्तरप्रदेशासाठी - 2, उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1 अशा एकूण 8  रेल्वे रवाना झालेल्या आहेत. तसेच  दि.11.05.2020  रोजी  सायं 5.00 वा.जबलपूर  (म.प्र.) साठी  व  रात्री 10.00 वा. जयपूर (राजस्थान) साठी  रेल्वेगाडया रवाना होत आहेत.                             
                                                               0000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या