अर्थव्यवस्थेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल: अमर देव सिंह

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अर्थव्यवस्थेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल: अमर देव सिंह


एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की ‘पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज घोषित केले, हे खरोखरच योग्य दिशेने टाकलेले स्वागतार्ह पाऊल आहे. बऱ्याच काळापासून हे करणे अपेक्षित होते. बाजारानेदेखील हे सकारात्मकतेने घेतले असून या घोषणेचा आनंदाने स्वीकार करत बेंचमार्क निर्देशांकात २.५ टक्क्यांनी वाढ झाली. कोव्हिड-१९ मुळे पूर्णपणे विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या आणि धाडसी पावलाची खूप गरज होती. तथापि, आपल्या सरकारसमोरील मोठे आव्हान म्हणजे महसूल आणि खर्चाचे संतुलन कसे साधायचे? अन्यथा आपली वित्तीय तूट हाताबाहेर जाऊ शकते. यामुळे आपल्या देशाचे रेटिंग कमी होऊ शकते.


प्रवास, पर्यटन एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि इतर ब-याच कोसळणा-या उद्योगांना वाचवण्यासाठी सकारात्मक उपाययोजना करणेही आवश्यक आहेत. मात्र आपल्याला अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पॅकेजच्या सविस्तर घोषणेची वाट पहावी लागेल. यातून कोणत्या क्षेत्राला किती मदत आली, यातील बारकावे स्पष्ट होतील. तरीही, सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. यामुळे भारत स्वावलंबनाच्या वाटेवर प्रगती करु शकेल असेही ते पुढे म्हणाले.