पुणेप्रवाह न्युज पोर्टल
*सामाजिक न्यायाचे जनक लोकराजा छ.राजर्षी शाहू महाराज यांना अभिप्रेत असे शासनाने कार्य करावे*-रघुनाथ ढोक
*शासनाने महाराष्ट्रात कायमची दारूबंदी करून सध्या धार्मिक स्थळातील पैसा वापरावा*
पुणे- बहुजनांचै कैवारी , आरक्षणाचे जनक , वेदोक्त शास्त्र विरोधक, जातिभेद निर्मूलन कर्ते , बहुजनांना शिक्षण घेता यावे म्हणून मोफत वसतिगृह सुरू करणारे, व सत्यशोधक , आंतरजातीय विवाहाला मदत ,तसेच आधुनिक दृष्टिकोन ठेवून विकास करणारे "लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आज ९८ वा स्मृतिदिन
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे" अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी कुटुंबासमवेत घरीच राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार व फुले अर्पण करून दिवा लावला.बळीराजा व इतर महापुरुषांचे फोटो आणि ग्रंथाचे देखील पूजन केले.हा दीड पुटी पूर्णाकृती पुतळा नुकतेच सनबीम शिक्षण संस्थेचे संचालक मा.नितीन कुदळे यांनी आमच्या संस्थेला भेट दिला म्हणून त्यांचे ढोक यांनी अभिनंदन केले.
यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की आपला महाराष्ट्र शिव,फुले,शाहू व आंबेडकर यांच्या विचाराचा आहे.सद्या लॉकडाऊन मुळे काम ,धंदा बंद, आर्थिक व्यवस्था बिकट यामुळे व्यसनाधीन जनता दारू, सिगारेट, गुटखा अशा विविध व्यसनापासून मुक्त होऊ लागली आहेत. अशातच नुकतेच शासनाने महसूल पोटी रक्कम मिळावी म्हणून दारू विक्री सुरू केली ही मोठी चूक आहे.यामुळे कोरोना संकट कमी होणार नसून भरमसाठ वाढणार आहे.ढोक पुढे असेही म्हणाले की हे लोक महिलांच्या वर अत्याचार करतील , नाहक पोलीस यंत्रणेला खूप काम वाढेल आणि सर्वत्र हातभट्टी वाल्याचा सुळसुळाट होऊन पैसे नसल्याने गरीब जनता घरातील विविध वस्तू विकून दारू पिऊन कुटुंबाची वाताहात करतील.तसेच
आपत्ती व्यवस्थापन 2005 नुसार काही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी दारूबंदी कायम ठेऊन लोकहिताचे चांगले काम केले म्हणून त्यांचे अभिनंदन करून पुढे मोठी आर्थिक मंदी निर्माण होणार आहे त्यामुळे शासनाने लोकांनचे हित पाहून उलट कायमचेच दारू सारखे सर्व धंदे बंद करून सध्या मंदिर, मस्जिद, चर्च सारख्या मोठया धार्मिक स्थळातून लोकांनीच दान केलेला पैसा हक्काने वापरून हे आर्थिक संकट कमी करावे.सत्य की जय हो.