विधान परिषदेची एकही जागा न दिल्याने भाजपवर रिपब्लिकन पक्ष नाराज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


#RAMDAS ATHAWALE# 


       कृपया प्रसिद्धीसाठी


*विधान परिषदेची एकही जागा न दिल्याने भाजपवर रिपब्लिकन पक्ष नाराज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
 
मुंबई दि. 8 - विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप च्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजप ने एक ही जागा रिपब्लिकन पक्षाला न दिल्याने राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज असल्याची प्रतिक्रिया  रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.


 मागील 8 वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष ताकदीने भाजप सोबत असून मित्र पक्ष म्हणून कायम भाजपला रिपाइं ने खंबीर साथ दिली आहे. मागील 8 वर्षांत भाजप ने रिपब्लिकन पक्षाला राज्यात एक ही विधान परिषदेचे जागा दिलेले नाही. त्यामुळे येत्या 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत रिपाइं ला भाजप ने 1 जागा देणे अपेक्षित होते. विधान परिषदेचे एक ही  जागा न दिल्याने भाजपवर रिपब्लिकन पक्ष नाराज असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले. 


                 हेमंत रणपिसे 
                प्रसिद्धिप्रमुख


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image