सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांचे सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क वाढवू नये... - संभाजी ब्रिगेड*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेसनोट...


*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांचे सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क वाढवू नये... - संभाजी ब्रिगेड*


▪️सर्व विद्यार्थ्यांचे चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क 
     50% माफ करून विद्यार्थ्यांना परत करावे.


महाराष्ट्रात सध्या 'कोरोना' महामारीचे संकट भयानक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य जनजीवन अत्यंत विस्कळीत झालेले आहे. यामुळे संपूर्ण राज्याची आर्थिक व शैक्षणिक व्यवस्था कोलमडून गेलेली आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यवसायिक, मजूर व सामान्य नागरिक 'लाॕकडाऊन' मुळे देशोधडीला लागले आहेत. सर्व शाळकरी, महाविद्यालयीन व विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. कारण परीक्षांच्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे सर्व परीक्षा अचानक बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी खचून गेलेले आहेत. अचानक परीक्षांचे पेपर रद्द झाल्याने सर्व पालक व विद्यार्थी संभ्रमात आहेत. *सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क वाढीला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे.* शैक्षणिक नुकसानीचा तिढा सरकारने योग्य पद्धतीने सोडवला पाहिजे. शैक्षणिक नुकसानभरपाई म्हणून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक शुल्क 50% सरकारने परत केले पाहिजे... अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे 


*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे* अंतर्गत सन 2020-2021 मध्ये येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक 'शुल्क' वाढवू नये. कारण मागील वर्षापासून बरेच महाविद्यालय शैक्षणिक शुल्क वाढविण्याचा घाट घालत आहेत. म्हणून मा. राज्यपाल महोदय, जून  2020 पासून येणाऱ्या चालू शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक शुल्क वाढवू नये.  तसा प्रस्ताव आपल्याकडे आल्यास तो रद्द करावा अशी विनंती व मागणी... महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.


 तसेच, *मार्च 2020 मुलांचे शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या महामारी मध्ये गेलेले आहे. त्यामुळे अचानक आलेल्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक व बौद्धिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे चालू मार्च 2020 पर्यंतचे शैक्षणिक नुकसानभरपाई म्हणून 50 टक्के शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना परत (वापस) मिळाली पाहिजे.* तरी राज्य सरकारने सुद्धा विद्यार्थी व पालकांची जबाबदारी ओळखून *50% शैक्षणिक शुल्क* विद्यार्थ्यांना परत करावे ही नम्र विनंती.


महाराष्ट्र प्रचंड संकटात असल्याने राज्यातील तरुणांना बळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण *सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठाचे सन 2020-2021 मध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थ्यांचे कोणतेही शुल्क वाढवू नये. तसेच सर्व विद्यापीठातील चालू मार्च 2020 पर्यंतचे 50% टक्के शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे... हा निर्णय सर्व विद्यापीठांना लागू करावा...* अशी विनंती वजा मागणी आपणास करण्यात येत आहे. तरी वरील मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. तरी पुढील सर्व कारवाई आम्हाला लेखी अथवा इमेल द्वारे कळवावी ही नम्र विनंती.


▪️- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.


▪️- प्रशांत धुमाळ, 
शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.


▪️- महादेव मातेरे, 
जिल्हासचिव, संभाजी ब्रिगेड, पुणे.


*महाराष्ट्र दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा...🚩*