राज्यातील चित्रपट, नाट्य क्षेत्रासह लोककलावंताना शासनाकडून मदत मिळावी – चित्रपट निर्माते, अ.भा. मराठी नाट्य परिषद अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे, दि. ३० - राज्यातील चित्रपट , नाट्य क्षेत्रासह लोककलावंताना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी चित्रपट निर्माते आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे 


पुणे  :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती, उद्योग यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील लोककलावंत, शाहीर, ऑर्केस्ट्रा कलाकार, नाट्य कलावंत यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सांस्कृतिक क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना आणि कामगारांना मदत मिळावी अशी मागणी चित्रपट निर्माते, अ. भा. मराठी नाट्य परिषद पिंपरी - चिंचवड शाखेचे अध्यक्ष व नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.


 


मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे की, राज्यपातळीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद यांच्यातर्फे कलाकारांना महिनाभर पुरेल इतक्या धान्याची सोय करण्यात यावी. ज्याप्रमाणे मागील काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे, तशी परिस्थिती चित्रपट, नाट्य या सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतावर येऊ नये याकडे सरकारने लक्ष द्यावे. महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र शाहीर परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या असणाऱ्या दीडशे शाखांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कलाकारांची यादी शासनाला देण्यास आम्ही तयार आहोत. यादीमधील कलाकारांना निःपक्षपाती पणे मदत पोहचविण्यासाठी विनंती सरकारला करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात होणारी विविध संमेलने, पुरस्कार सोहळे यांचा निधी कलावंतांच्या मदतीसाठी वर्ग करण्यात यावा, त्यामधून साधारण पाच ते दहा कोटी रुपयांची मदत राज्यातील कलावंत, पडद्यामागील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांना मदत करावी असे भोईर यांनी या पत्रात नमूद केले आहे.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image