केपजेमिनी व कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने सॅनिटायझर  व पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*केपजेमिनी व कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने सॅनिटायझर  व पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द*


  पुणे दि.11:- केपजेमिनी लिमिटेड या कंपनीच्या वतीने आतापर्यंत एकूण 3 हजार 500 पीपीई किट, 1 हजार 500 फेस शिल्ड, 50 इन्फ्रारेड थर्मामीटर आणि एक हजार सॅनिटायझर च्या बॉटल मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कमिन्स इंडिया फौंडेशन, बालेवाडी या कंपनीच्या वतीने 300 पीपीई किट, एक हजार एन 95 मास्क, 5 हजार ट्रिपल लेअर मास्क जिल्हाधिकारी श्री. राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे तसेच केपजेमीनी कंपनीचे मनीष मेहता, विनय शेट्टी, कमिन्स कंपनीच्या सपना खरबस उपस्थित होत्या. सीएसआर निधीतून जिल्हा प्रशासनाला वैद्यकीय साधनांची मदत केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री राम यांनी कंपनीचे आभार मानले.
000000


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image