विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे नवीन कोरोना विषाणू   (कोविड-19) सद्य :स्थिती  व उपाययोजना 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
नवीन कोरोना विषाणू   (कोविड-19) सद्य :स्थिती  व उपाययोजना
दि.01/05/2020
प्रेसनोट(संध्या 4.00 वाजेपर्यत)


      पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.
    विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  1986  झाली आहे.विभागातील  358 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 1519 आहे.विभागात कोरोनाबाधीत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.


 


                 आजपर्यत विभागामध्ये एकुण  19989 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 19096 चा अहवाल प्राप्त आहे. 1048 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 17058  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1986 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
         आजपर्यंत विभागामधील  66,01,329 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,55,47,352 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1452 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.