पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम' च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले कौतुक*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम' च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले कौतुक*


  पुणे दि. 13 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या  'कोविड 19 वॉर रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले.  कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या.


 यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम' मधून होणाऱ्या कामाचे कौतुक करुन महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेलीकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) मध्ये आजवर वैद्यकीय सुविधा घेतलेल्या नागरिकांची संख्यात्मक माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली. 


  गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करताना विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या  जीपीएस ट्रॅकींगवर भर द्यावा, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 


   यावेळी फ्लू सेंटर मध्ये तपासणी केलेले रुग्ण, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल येथील खाटांची व्यवस्था, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल, त्यातील पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, प्रलंबित सॅम्पल ची संख्या, आतापर्यंतचे पॉझिटीव्ह, निगेटीव्ह व मृत रुग्ण, दैनंदिन वाढत जाणा-या केसेस, कोविड 19 बाबत जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजना, स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली निवारा केंद्रे, याबाबत श्री. हर्डीकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोना विषयक कामासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी यावेळी  सांगितले.  
0000000


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image