बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री निधीस 1 कोटीं रुपयांची देणगी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री निधीस 1 कोटीं रुपयांची देणगी


बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांतर्फे महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 यामध्ये कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुपये 1.00 कोटींच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. 


सद्या संपूर्ण जगामध्ये या महामारीचे संकट उभे ठाकले असून त्या पार्श्वभूमीवर ही मदत करण्यात येत आहे


बँकेचे मुंबई अंचल कार्यालयाचे सरव्यवस्थापक श्री विजय कांबळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील उप सचिव श्री मयेकर यांना आज दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी धनादेश सुपूर्द केला.


यापूर्वी दिनांक 16 एप्रिल रोजी बँकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पंतप्रधान निधींसाठी रुपये 5 कोटींची देणगी याव्यतिरिक्त दिलेली आहे.


बँक ऑफ महाराष्ट्र  कोविड -19 महामारी विरोधात पुकारलेल्या या युद्धामध्ये  अग्रस्थानी असून बँकेच्या 1800 पेक्षा अधिक शाखा तसेच 1850 एटीएम्सच्या माध्यमातून अखंडित वित्तीय सेवा पुरवीत आहोत. याशिवाय बँकेचे बँक-मित्र / बँकिंग-प्रतींनिधी (बँकिंग करस्पॉन्डन्स) देशामध्ये 3000 विविध ठिकाणी वित्तीय सेवा पुरवत आहेत. 


 


बँक शाखांना भेट देणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी उचित काळजी घेतली जात असून सामाजिक अंतर राखण्यासह सॅनिटायझर देखील पुरवले जात आहे


 


बँकेच्या देशभरातील सर्व 32 विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना पाठिंबा देण्यासाठी चेहर्‍यावरील मास्क, ग्लोव्हज, कॅनोपी छत्र्या, पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे, किराणा सामान इत्यादी साहित्य वितरित करण्याचे उपक्रम बँकेद्वारे  घेतले गेले आहेत.


 


बँक ह्या कोविड -19 महामारी दरम्यान कर्तव्य बजावत असलेलेल्या आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभी असून त्यांना आवश्यक मदत तसेच आर्थिक स्वरूपातही प्रोत्साहन देत आहे.