मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


पुणे दि.२९: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी अँपच्या वतीने नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली मेड ऑन गो ही प्रणाली अत्यंत उपयुक्त असून नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रणालीचा लाभ घ्यावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


  कोविड साथीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली होती,यावेळी मेड ऑन गो या प्रणालीचे उपमुख्यमंत्री यांनी उदघाटन केले.यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम,महापौर मुरलीधर मोहोळ,आमदार अशोक पवार,संजय जगताप,राहूल कुल,विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड,पुणे पोलीस आयुक्त के.वेंकटेशम,जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई ,पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,आय टी सेल प्रमुख नीलकंठ पोमण तसेच उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.     


       याप्रणालीबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले,कोविड साथीबाबत नागरिकांना घरबसल्या अचूक मार्गदर्शन मेड ऑन गो द्वारे मिळणार असून त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नॉन कोविड रुग्णांची तपासणीसाठी कोविड सेंटरवर विनाकारण होणारी गर्दी यामुळे कमी होईल.व्हिडिओ कंसलटिंगची सुविधा या प्रणालीमध्ये आहे.त्याचप्रमाणे स्मार्ट सारथी अँप द्वारे कंटेन्मेंट भागातील कोविड रुग्ण शोधता येतील. नागरिकांना ई पास,हेल्थ असेसमेंट सर्व्हे, सिटीझन व्हॉलेंटर,घरपोच किराणा,औषधे,फळभाज्या अशा सुविधा उपलब्ध असल्याचे श्री.हर्डीकर यांनी सांगितले.


           ००००००००००००००


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image