पुणे प्रवाह न्युज पोर्टल
press note
*आरोग्य यंत्रणेस माजी सैनिकांकडून आरोग्य किटचे वाटप* ------------------------- *बांधकाम,स्वच्छता कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
पुणे:
शासकीय पुनःनियुक्त माजी सैनिक संघटना, श्री सिध्दीविनायक सांस्कृतीक ट्रस्ट व नवभारत मानवतावादी संस्थेच्यावतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी सक्षमपणे लढा देणा-या आरोग्य व पोलिसयंत्रणेचा आरोग्यकिट आणि संघटनेचा कर्मयोगी विशेषांक देऊन आभार मानण्यात आले.
महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त बांधकाम/स्वच्छता कामगारांना मास्क, सॅनिटायझर व आटा, तांदूळ, रवा, साखर, डाळ, इत्यादी जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, कोषाध्यक्ष निरंजन काकडे, अंबादास पालवे, बलभीम पवार तसेच संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
डॉ राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता व कोविड-१९ लॅबरोटरी प्रमुख, बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच डॉ. रमेश भोसले, प्राध्यापक व विभागप्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय आणि नायडू हॉस्पीटल मध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.
जगावर ओढावलेल्या कोरोनाव्हायरस विरोधातील युध्दजन्य स्थितीत माजी सैनिक राज्यात आरोग्य व पोलीसयंत्रणेमध्ये मोठ्या संख्येने सेवा देत आहेत कोरोना विषाणू विरुध्दचे हे जागतिक महायुध्द निर्णायक टप्प्यात असून शिस्तबध्द पध्दतीने वैद्यकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन केल्यास लवकर जिंकता येईल,असे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. -------------------------