एमजी मोटर इंडियाची मेडक्लिनसह हातमिळवणी ~ कारसाठी इंडस्ट्री-लीडिंग केबिन स्टरलायझेशन टेक्नोलॉजी आणणार ~

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


एमजी मोटर इंडियाची मेडक्लिनसह हातमिळवणी


~ कारसाठी इंडस्ट्री-लीडिंग केबिन स्टरलायझेशन टेक्नोलॉजी आणणार ~


मुंबई, १७ एप्रिल २०२०: एमजी मोटर इंडियाने आपल्या कारच्या केबिनची हवा आणि पृष्ठभाग नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी सिंगापूरमधील मेडक्लिन कंपनीशी हातमिळवणी केली. हेक्टर आणि झेडएस ईव्ही या भारतीय उत्पादनांमध्ये मेडक्लिनची पेटंट केबिन स्टरलायझेशन टेक्नोलॉजी सेराफ्यूजन इन्स्टॉल करण्यासंबंधी व्यवहार्यतेचे मूल्यांकन आता एमजी मोटर इंडिया करेल.


युनिक आणि गेमचेंजिंग इनोव्हेशन असल्याने सेराफ्यूजन टेक्नोलॉजी प्रवाशांचे आरोग्य आणि वेलनेसची हमी देत कारचे केबिन पूर्णपणे जंतूविरहित आणि स्टरलाइज करते. कोणत्याही रसायनाविना सक्रियतेने अॅलर्झन्स, प्रदुषके आणि सूक्ष्मजीवांना निष्प्रभ करण्यासाठी सक्रिय ऑक्सिजनचा वापर या तंत्रज्ञानात केला जातो. हे सोल्युशन केबिनमधील हवेतील बॅक्टेरिया, मोल्ड, यीस्ट आणि व्हायरस नष्ट करते तसेच कारमधील विविध पृष्ठभागही जंतूविरहीत करते.


एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव चाबा म्हणाले,‘ नावीन्य आणि सुरक्षेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळेच या क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक कंपनी मेडक्लिनशी आम्ही भागीदारी करत आहोत. जेणेकरून आमच्या वाहनांमध्ये जागतिक स्तरावरील केबिन स्टरलायझेशन सोल्युशन इन्स्टॉल करण्याची शक्यता आहे. आम्ही सक्रियतेने एचव्हीएसी सिस्टिम बेस्ड केबिन स्टरलायझेशन आणि डिशइंफेक्शन टेक्नोलॉजी तैनात करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना स्वच्छा आणि सुरक्षित कारसोबत सुरक्षित परिवहनाचा अनुभव आणि सेवा विकसित करण्याच्या दिशेने काम सुरूच ठेवूत. फ्यूचर फॉरवर्ड ब्रँडच्या रुपात ही नवी सुरुवात कोरोनाच्या साथीनंतर जगातील ‘न्यू नॉर्मल’ प्रति आमची तत्परताही दर्शवते.'


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image