पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुनीत बालन ग्रुपच्या वतीने पत्रकारांची कोरोना पूर्व चाचणी
- महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार
पुणे, - कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सामान्य नागरिकांपर्यंत योग्य आणि अधिकृत माहिती पोहचवण्याचे काम शहरातील पत्रकार करत आहेत. प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना स्वॅब टेस्टिंगची गरज आहे किंवा नाही हे सांगणारी कोरोना पूर्व चाचणी पुनीत बालन ग्रुपच्या वतीने घेण्यात आली, यामध्ये दीडशेहून अधिक पत्रकारांची तपासणी करण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुनीत बालन ग्रुप आणि मेट्रो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने या कोरोना पूर्व चाचणीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद अ. कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप, लीड मीडियाचे विनोद सातव, मेट्रो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. रणजीत निकम, डॉ. शैलेंद्र माने, डॉ. राजेंद्रसिंह राजपुरोहित, सचिन गुळवे, कॅलिडस मीडिया अकॅडमीचे पंकज इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.