कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेच्यावतीने गरीब गरजू लोकांना सुकाशिधा वस्तूंचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेच्यावतीने गरीब गरजू लोकांना सुकाशिधा वस्तूंचे वाटप


          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश  लॉकडाऊन मध्ये असताना सर्वसामान्य जनतेस अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे. याची जाण ठेवून लष्कर ए भीमा या सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सचिन धिवार यांच्या अध्यक्षतेखाली नाना पेठ व भवानी पेठ येथील गरीब गरजू कुटुंबांना सुका  शिधा वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये दहा किलो तांदूळ, दहा किलो पीठ, दोन किलो तूर डाळ, दोन किलो गोड तेल, दोन किलो साखर, एक किलो मीठ, 2 नग आंघोळीचे साबण, 2 नग कपडे धुण्याचे साबण, मिरची पावडर, हळद पावडर इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. 
        या कार्यास माणुसकी फाऊंडेशन व लष्कर ए भीमाचे अध्यक्ष सचिन धिवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय सोनवणे विशेष प्रयत्न केले.