आजच्या कोरोना संकटात पुणे मनपाचे आरोग्यसेवक जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी कर्तव्य बजावत आहे, त्यांची काळजी घेणे हेच आपले परमकर्तव्य..!- नगरसेविका #अश्र्विनी_कदम*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आजच्या कोरोना संकटात पुणे मनपाचे आरोग्यसेवक जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी कर्तव्य बजावत आहे, त्यांची काळजी घेणे हेच आपले परमकर्तव्य..!- नगरसेविका #अश्र्विनी_कदम*


आपल्या मनपातील आरोग्य सेविकेचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणुन इतर सेवकांची काळजी आणि जबाबदारीचा भाग म्हणन स्वखर्चातून आज उचलेले हे पाऊल. 


आज आपल्या प्रभागातील पुणे मनपाचे आरोग्य खात्यातील स्वच्छता विभागातील सर्व सेवक, '#स्वच्छ' संस्थेच्या माध्यमातून सेवा पुरवणारे सेवक व तसेच पुणे महानगरपालिकेच्या कै. #शिवशंकर_पोटे दवाखान्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्याची योग्य व सुरक्षित काळजी घेण्याच्या उपाययोजनेतून व त्यांचा Covid-19 च्या विरोधातील लढा यशस्वी करण्याच्या दृष्टीने #मास्क सोबत "#फेस_शिल्ड" व #सॅनिटायजर वाटप करण्यात आले


जे #फेस_शिल्ड त्यांना देण्यात आले ते त्यांच्या कामाचा व आरोग्याचा विशेष विचार करून बनविण्यात आले. ते म्हणजे अनेक सेवकांना झाडणकाम, ड्रेनेज सफाई, कचरा व्यवस्थापन करणे व इतर कामे करताना अडचणी येऊ नये व त्यांना त्याचा रोज वापर करता येईल(रियुझेबल) व जेणेकरून सदर फेस शिल्ड रोज सॅनिटायज करता येईल अशा पद्धतीचे आहेत.


-#नितीन_कदम (अध्यक्ष-पर्वती)
   रा.काँ.पा.