पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे पोलीस बांधवांसाठी बिग वडा पाव वाटप
सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे आणि मालिकार्जुना रेडी फूड्स प्रा.ली. च्या एकत्रित संयोगाने पुणे पोलीस झोन 3 मधील सर्व पोलीस बांधव , नाकाबंदी पोलीस आणि इतर पोलीस स्टाफ यांना त्यांनी करोना covid 19 च्या बंदोबस्त मध्ये दाखवलेल्या कार्यतत्परता आणि सामाजिक सेवेचे सन्मान करण्यासाठी बिग वडा पाव वाटप चा कार्यक्रम दि. 21.04.2020 ते दि.03.05.2020 पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार वाटप करण्यात येणार आहे. सदर झोन मध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रोड , एरंडवणे , उत्तमनगर , आणि दत्तवाडी या ठीकानी बिग वडापाव चे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाउन पूर्वीच शेफ पराग आणि मालिकार्जुना रेडी फूड चे डायरेक्टर कुंदन देवघरे यांनी बिग वडा पाव हा ब्रँड पुणे मध्ये वेगवेगळ्या 22 ठिकाणी प्रशस्त आउटलेट मध्ये लाँच करणार होते पण 26 मार्च पासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलला गेला.
दरम्यान शेफ पराग आणि कुंदन देवघरे यांनी पोलीस बांधवांसाठी बिग वडा पाव वाटप ची योजना पोलीस उपायुक्त झोन 3 सौ. पौर्णिमा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आणि त्याला त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि योजनेला परवानगी दिली. सदर झोन मध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रोड , एरंडवणे , उत्तमनगर , आणि दत्तवाडी या ठीकानी बिग वडापाव चे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
बिग वडापाव वाटप दरम्यान सर्व पोलीस बांधवांचे अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाले आणि सगळे पोलीस बांधव लॉकडाउन दरम्यान चविष्ट खर्डा वडा पाव मुळे तृप्त झालेत असे शेफ पराग यांनी सांगितले.
ज्या प्रमाणे देशाचे सैनिक सीमेचे रक्षण करतात त्या प्रमाणे पोलीस हे अंतर्गत सुरक्षा करतात आणि आजच्या विषाणूच्या युद्धात माझ्या देशातील बांधवांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर थांबतात त्या वेळेस एक मराठी सेलिब्रिटी शेफ येऊन प्रेमाने सर्वांचा आवडता वडा पाव ची प्रेमाची भेट देतो हा प्रसंग अत्यन्त उत्साहवर्धक आहे.